विषय समिती निवडी बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विषय समिती निवडी बिनविरोध
विषय समिती निवडी बिनविरोध

विषय समिती निवडी बिनविरोध

sakal_logo
By

chd212.jpg-
84328
अभिजित गुरबे
chd213.jpg-
84329
फिरोज मुल्ला
chd214.jpg-
84330
अनिता परीट
chd215.jpg-
84331
नेत्रदीपा कांबळे
------------------------------------
विषय समिती निवडी बिनविरोध
---
चंदगड नगरपंचायत; नगराध्यक्षांसह नगरसेवक उपस्थित
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २१ ः येथील नगरपंचायतीच्या विषय समितीचे सभापती व सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या.
बांधकाम व नगरविकास समितीच्या सभापतिपदी अभिजित गुरबे यांची निवड झाली. समितीत झाकीरहुसेन नाईक, माधुरी कुंभार, दिलीप चंदगडकर, विजय कडूकर यांची सदस्यपदी निवड झाली. आरोग्य व पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांची निवड झाली. या समितीत संजीवनी चंदगडकर, झाकीरहुसेन नाईक, दिलीप चंदगडकर व नूरजहाँ नाईक यांची सदस्यपदी निवड झाली. क्रीडा, सांस्कृतिक कार्य व शिक्षण समिती सभापतिपदी अनिता परीट यांची निवड झाली. अनुसया दाणी, झाकीरहुसेन नाईक, दिलीप चंदगडकर, सचिन नेसरीकर यांची सदस्यपदी निवड झाली. महिला व बालकल्याण सभापतिपदी नेत्रदीपा कांबळे यांची निवड झाली. माधुरी कुंभार, अनुसया दाणी, संजना कोकरेकर, प्रमिला गावडे यांची सदस्यपदी निवड झाली. नगराध्यक्षा प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष मुल्ला यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.