सोमय्या कोल्हापुरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोमय्या कोल्हापुरात
सोमय्या कोल्हापुरात

सोमय्या कोल्हापुरात

sakal_logo
By

किरीट सोमय्या उद्या कोल्हापुरात

जिल्हा बँकेला देणार भेट ः जिल्हा उपनिबंधक, शेतकऱ्यांशीही करणार चर्चा

सकाळ वृत्तसेवा,
कोल्हापूर, ता. २१ ः राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप करून या संदर्भात सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) तक्रार केलेले भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या गुरुवारी (ता. २३) पुन्हा एकदा कोल्हापुरात येत आहेत. त्यांनीच ही माहिती ट्विट करून आज दिली.
या भेटीत आपण जिल्हा सहकार निबंधक, बँक व कंपनीचे सदस्य, शेतकरी व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. श्री. सोमय्या यांनी श्री. मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला चुकीच्या पद्धतीने पैसे पुरवल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर जिल्हा बँकेतून गडहिंग्लज कारखाना चालवण्यास घेतलेल्या ‘ब्रिक्स’ कंपनीला केलेला अर्थपुरवठाही वादग्रस्त होता, असे आरोप केले आहेत. या आरोपामुळे गेल्या महिन्यात श्री. मुश्रीफ यांच्यासह त्यांचे नातेवाईक व घोरपडे कारखान्यावर सीबीआयचा छापा पडला होता. ‘ब्रिक्स’ला केलेल्या कर्जपुरवठ्याबद्दल बँकेच्या आजी-माजी संचालकांनाही ‘ईडी’ने नोटीस काढली आहे. यातील तिघांना १४ फेब्रुवारी रोजी चौकशीला बोलवले होते. २०१५ ते २१ या कालावधीतील संचालकांच्या मागे हा ‘ईडी’चा ससेमिरा लागणार आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच श्री. सोमय्या स्वतः २३ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात येऊन बँकेसह उपनिबंधक कार्यालयात भेट देणार आहेत.
.......
काय म्हटलेय ट्विटमध्ये ...

हसन मुश्रीफ परिवार घोटाळा, मी गुरुवार २३ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरचा दौरा करणार. जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकार निबंधक, बँक व कंपनीचे सदस्य, शेतकरी व अन्य अधिकारी यांची भेट घेणार.
.........