Thur, March 23, 2023

सुमंगलममध्ये आज कला सोहळा
सुमंगलममध्ये आज कला सोहळा
Published on : 21 February 2023, 4:25 am
‘सुमंगलम्’मध्ये आज रंगणार कला सोहळा
कोल्हापूर ः कणेरी मठावर आयोजित सुमंगलम् पंचमहाभूत महोत्सवात बुधवारी (ता. २२) परिसरातील सुमारे ५० अभिजात चित्रकार स्वयंस्फूर्त विविध शैलीत कलाकृती साकारणार आहेत. अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश या पंचमहाभूतांवर आधारित या कलाकृती असतील. ५० कलाकार हे ५० कलाकृती साकारणार असून, सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत हा कला सोहळा रंगणार आहे. या कलाकृती कणेरी मठावर कायमस्वरूपी रसिकांना पाहण्यासाठी उपलब्ध केल्या जातील.