
कोल्हापूर व काश्मिरचं नातं उलगडलं
84404
...
उलगडले काश्मीर - कोल्हापूरचे नाते ...
‘बॉर्डरलेस वर्ल्ड’च्या माध्यमातून चाळीस अनाथ मुलींची भेट
कोल्हापूर, ता. २१ ः दहशतवादी कारवाया, कधी बॉम्बस्फोट तर कधीही अनपेक्षितपणे घडणाऱ्या घटना आणि त्यातून जाणारे हकनाक बळी...हे सारं वाचताना किंवा ऐकताना समोर येते ते जम्मू-काश्मीर. अशाच घटनांतून अनेक मुली काश्मीरमध्ये अनाथ झाल्या आणि त्यांचं सारं आयुष्यच बदलून गेलं. यापैकीच चाळीस मुली आज येथे आल्या. विविध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आणि त्यांच्याशी संवादातून काश्मीर आणि कोल्हापूरचं अनोखं नातं उलगडत गेलं. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रमाचे आयोजन झाले.
फाउंडेशनचे अध्यक्ष अधिक कदम यांनी या मुलींसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. फाउंडेशनच्या माध्यमातून गेली २७ वर्षे काश्मीरमधील अनाथ, निराधारांसाठी काम सुरू आहे. लहानपणीच आई-वडिलांचे अनपेक्षितपणे छत्र हरपल्यानंतर त्यांच्या मनात निर्माण झालेली भीती कायमची काढून टाकून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही भेट असून, विशेषतः जाती-धर्माच्या भिंती तोडून कोल्हापूरनं जपलेली सर्वधर्मसमभावाची परंपरा यानिमित्ताने त्यांना समजणार आहे, असे श्री. कदम यांनी सांगितले.
...
श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांशी संवाद
सकाळी या मुलींनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी या मुलींनी संवादही साधला. मुलींच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या वसतिगृहासाठी आवश्यक ती मदत दिली जाईल, अशी ग्वाही श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी यावेळी दिली. येथील मुस्लिम बोर्डिंगमध्ये चार वर्षापूर्वी दोन काश्मिरी मुलींच्या राहण्याची सोय केली होती. या मुली आता शिक्षण पूर्ण करून दिल्ली व मुंबईत चांगल्या पगाराच्या नोकरी करत असल्याचेही यावेळी श्री. कदम यांनी सांगितले. मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर यावेळी उपस्थित होते.
--