देशी गायी, वळूंच्या प्रजातींचे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशी गायी, वळूंच्या प्रजातींचे प्रदर्शन
देशी गायी, वळूंच्या प्रजातींचे प्रदर्शन

देशी गायी, वळूंच्या प्रजातींचे प्रदर्शन

sakal_logo
By

84485
...

पशू प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद

विविध प्रजातींच्या गायी, बैल, श्वान पाहण्यास गर्दी

कोल्हापूर, ता. २२ ः सिद्धगिरी मठावर सुरू असणाऱ्या सुमंगलम महोत्सवातील पशू प्रदर्शनाला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणी सुमारे २० प्रकारच्या देशी गायी, बैल आहेत. शिवाय म्हशींच्या देशी प्रजातीही पाहायला मिळतात. श्वान आणि मांजरांच्या प्रजातीही यामध्ये आहेत.
या प्रदर्शनात गायींच्या खिलार, देवणी, डांगी, लाल कंधारी, गीर, ओंगल, कोकणगिड्डा, वेचूर, राठी, कांक्रेस, बारगूर, थारपारकर, हल्लीकर या प्रजाती आहेत. याच प्रजातींचे वळूदेखील येथे आहेत. म्हशींमध्ये मुर्हा, पंढरपुरी, जाफराबादी, म्हैसाणा या जातींच्या म्हशी आणि रेडे पाहायला मिळतात. कारवान, मुधोळ हाउंड, पश्मी यांच्यासह विविध देशी प्रजातीचे श्वान पाहण्यासाठी लोकांची गर्दी दिसून येते. मारवारी आणि काठीयावारी या अश्व प्रजातींचे कौतुक पशुप्रेमींकडून होत आहे. तसेच सिंधी, नुकरा आणि भिमथडी या प्रजातींच्या अश्वांनीही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. जंगली मांजर आणि फेरल कॅट प्रदर्शनात दिसतात. यातील म्हैस, घोडा आणि गाय यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्राण्यांची शरीरयष्टी, चाल, कातडी, कास, प्रजातींचे वैशिष्ट्य या गोष्टी लक्षात घेऊन स्पर्धेचे परीक्षण केले जाणार आहे. त्यातून तीन क्रमांक निवडले जातील.
-------

दीड कोटींचा रेडा
पशू प्रदर्शनात दीड कोटी रुपयांचा मुर्हा प्रजातीचा रेडा आणण्यात आला आहे. याचे वजन १६०० किलो आहे. या रेड्याला पाहण्यासाठी गर्दी होत असून त्याचा रुबाब सर्वांनाच आकर्षित करणारा आहे.