गड-अत्याळ हायस्कूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-अत्याळ हायस्कूल
गड-अत्याळ हायस्कूल

गड-अत्याळ हायस्कूल

sakal_logo
By

gad221.jpg
84495
अत्याळ : विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करताना जयसिंग कांबळे. शेजारी एन. एल. कांबळे, एम. ए. पाटील, टी. एन. पालकर.
-----------------------------
महाराष्ट्र हायस्कूलमध्ये बक्षीस वितरण
गडहिंग्लज : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. जयसिंग कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. विठ्ठल मंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. मुख्याध्यापक एन. एल. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. टी. एन. पालकर यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. विविध क्रीडा स्पर्धांत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना गौरविले. क्रीडा सहायक अनिल कांबळे यांचाही सत्कार झाला. जयसिंग कांबळे म्हणाले, ‘बुद्धिमत्ता व्यक्तीनुरूप वेगळेवगळी असते. परंतु, प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या व्यक्तीकडूनच महान कार्य घडते.’ शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. माधुरी अडसुळे यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा विभागप्रमुख एम. ए. पाटील यांनी आभार मानले.