दहावीतील विद्यार्थ्यांचा तारदाळळा सदिच्छा समारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावीतील विद्यार्थ्यांचा तारदाळळा सदिच्छा समारंभ
दहावीतील विद्यार्थ्यांचा तारदाळळा सदिच्छा समारंभ

दहावीतील विद्यार्थ्यांचा तारदाळळा सदिच्छा समारंभ

sakal_logo
By

ich221.jpg
84508
तारदाळ : येथील सन्मती विद्यालयासाठी सदिच्छा समारंभानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेच्या इमारत बांधकामासाठी एक लाख रुपयांचा निधी मुख्याध्यापक एस. एस. पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
------------
दहावीतील विद्यार्थ्यांचा
तारदाळळा सदिच्छा समारंभ
तारदाळ, ता. २१ : येथील सन्मती विद्यालयात दहावी सदिच्छा समारंभ उत्साहात झाला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या इमारत बांधकामासाठी एक लाख रुपयांचा निधी मुख्याध्यापक एस. एस. पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या वैद्यकीय शिक्षण घेणारे स्नेहल कांबळे, केदार कदम, अनिकेत बन्ने व पालक अनिता आरगे, सुकुमार कोठावळे, शीतल मजलेकर, पर्यवेक्षक एम. बी. पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापक एस. एस. पाटील अध्यक्षस्थानी होते. आदर्श विद्यार्थी म्हणून कार्तिक पालके, शर्वरी मोरे यांचा सन्मान करण्यात आला. वर्गशिक्षक आर. सी. चौगुले, सूरज पाटील, स्नेहल कांबळे, साक्षी बन्ने, राजेंद्र कांबळे व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक श्री. पाटील म्हणाले, की विद्यार्थी व पालक यांच्या सहकार्याने शाळेची नूतन इमारत साकारत आहे. भविष्यात शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी मिळून पुढाकार घ्यावा. पर्यवेक्षक एम. बी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शाहिस्ता पट्टेकरी व श्रावणी हेरवाडे यांनी सूत्रसंचालन केले. एस. बी. मसुटे यांनी आभार मानले.