संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

19688
डॉ. सुनील पाटील यांना
वैद्यरत्न वंश वैद्य पुरस्कार
कोल्हापूर ः चेन्नई (तामिळनाडू) येथील दीडशे वर्षांची आयुर्वेद प्रचार व प्रसाराची परंपरा असणाऱ्या वैद्यरत्न पंडित गोपालचारलू श्री आयुर्वेद संस्थेच्या वतीने दिला जाणारा वैद्यरत्न वंश वैद्य पुरस्कार येथील आयुर्वेदाचार्य वैद्य सुनील पाटील यांना घोषित झाला आहे. श्री आयुर्वेद संस्थेच्या वैद्य जयश्री यांनी नुकतीच ही घोषणा केली. डॉ. पाटील वनौषधी विद्यापीठ संस्थेच्या माध्यमातून गेली चाळीस वर्षे जगभरातील विविध ठिकाणी आयुर्वेद प्रचार व प्रसाराचे काम करत आहेत. विविध देशांत आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदांतून आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार त्याबरोबरच महर्षी महेशयोगी प्रणित भावातीत ध्यान पद्धतीबाबतही प्रचाराचे काम त्यांनी केले आहे. त्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
---------------
ध्रुब बरुवा मेमोरियल
फोरमतर्फे शनिवारी कार्यक्रम
कोल्हापूर : ध्रुब बरुवा मेमोरियल फोरतर्फे शनिवारी (ता. २५) वास्तूकला व बांधकाम या विषयावर चर्चासत्र होणार आहे. या क्षेत्रातील नवीन संकल्पना, वास्तूविषयक ज्ञानाचे आदान-प्रदान या उद्देशाने हा कार्यक्रम होणार आहे. शिवाजी विद्यापीठातील भाषा भवनात दुपारी अडीचला कार्यक्रम होईल. प्रसिद्ध आर्किटेक्ट संजय मोहे (बंगळूर), आर्किटेक्ट बिजोय रामचंद्रन (बंगळूर), आर्किटेक्ट बिजू कोरिकोसे (चेन्नई), आर्किटेक्ट ऋतुराज पारेख (गोवा) या वेळी उपस्थितांशी संवाद साधतील. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी आर्किटेक्ट अमोल कुमटोळीकर, आर्किटेक्ट अजिंक्य चव्हाण, आर्किटेक्ट प्रद्युम्न घुगरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन फोरमने केले आहे.
-----------
ज्येष्ठ नागरिक सेवा
संघातर्फे आज व्याख्यान
कोल्हापूर ः तपोवन परिसर चव्हाण कॉलनी ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे उद्या (गुरुवारी) विरंगुळा केंद्रामध्ये निवृत्त उपप्राचार्य अरविंद मानकर यांचे ‘आरोग्य संगीत व निवृत्तीनंतरचे जीवन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. उत्कृष्ट कथा संग्रह लेखक, भक्तीयोग, संगीत तज्‍ज्ञ आणि उत्कृष्ट सूत्रसंचालक अशी त्यांची ओळख आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघाने केले आहे.