टिंबर मधील एकावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टिंबर मधील एकावर गुन्हा दाखल
टिंबर मधील एकावर गुन्हा दाखल

टिंबर मधील एकावर गुन्हा दाखल

sakal_logo
By

टिंबर मार्केटमधील तिघांवर गुन्हा दाखल

विनयभंग, बालकांचे संरक्षणासह अन्य कलमांचा समावेश

कोल्हापूर, ता. २२ ः घराच्या दारावर दगड मारून, शिवीगाळ केली, तसेच लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याबद्दल
टिंबर मार्केटमधील गवत मंडई येथील तिघांवर आज गुन्हा दाखल झाला. आदर्श सुभाष पाटोळे (रा. गवत मंडई, टिंबर मार्केट) आणि अन्य दोन अनोळखी व्यक्ती (नाव, पत्ता माहीत नाही) अशी यांची नावे आहेत. त्यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. रात्री उशिरापर्यंत त्यांना अटक झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मुलगी दुपारी दोनच्या सुमारास आधार कार्डची झेरॉक्स काढण्यासाठी जाताना तिच्याकडून ते काढून घेऊन तिला पाटोळेने धमकी दिली. यानंतर सायंकाळी तिचे वडील पाटोळेकडे आधार कार्ड मागण्यासाठी गेल्यानंतर देत नाही जा, असे सांगून शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीचा काका दुचाकीवरून येत असताना त्यालाही रस्त्यात अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर भीतीने तो घरी गेला. तरीही पाटोळेने त्यांच्या दारात जाऊन दारावर दगडफेक केली आणि शिवीगाळसुद्धा केली. याबाबत मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार अन्य कलमांच्या आधारे गुन्हा नोंद केला आहे.
------