दूध चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दूध चोरी
दूध चोरी

दूध चोरी

sakal_logo
By

‘गोकुळ’ची पुन्हा एकदा दूध चोरी
कागल तालुक्यातील प्रकार; संबंधित वाहतूकदाराला १० हजारांचा दंड

कोल्हापूर, ता. २३ ः जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) संकलित दुधाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाने एका संस्थेतील दूध चोरून दुसऱ्या संस्थेच्या कॅनमध्ये घातल्याचा प्रकार कागल तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित वाहतूकदाराला जाग्यावर १० हजारांचा दंड केला. ही चोरी किती दिवसांपासून सुरू होती, त्याचा किती फटका संघाला आणि त्या संस्थेला बसला याची चौकशी सध्या सुरू आहे.
ज्या संस्थेचे दूध संकलन जास्त आहे, त्या संस्थेच्या कॅनमधील दूध काढून ते कमी संकलन असलेल्या त्याच टेम्पोतील दुसऱ्या संस्थेच्या कॅनमध्ये घातले जात होते. ज्या संस्थेच्या कॅनमधून दूध काढले जाते, त्यात पाणी घालून संबंधित कॅनची पातळी राखली जात होती. पण, चिलिंग सेंटरवर ज्या संस्थेच्या कॅनमधून दूध काढले जात होते, त्यात पाणी असल्याने वासाचे दूध म्हणून ते नाकारले जात होते. गेली अनेक दिवस हा प्रक्रार विविध संस्थांच्या बाबतीत सुरू होता. त्यावरून कोण तर दूध चोरी करत असल्याचा संशय आला. याची गंभीर दखल घेत प्रशासनाने या मार्गावर संबंधित टेम्पोचालकांवर पाळत ठेवली होती. त्यात हा टेम्पोचालक काल रात्री सापडला. या पाहणीत काही संस्थांच्या कॅनमध्ये कमी दूध तर ज्या संस्थेचे दूध कमी येणे अपेक्षित होते, त्या संस्थेचे जास्त दूध येत असल्याचे निदर्शनास आले. त्यातून संबंधित वाहतुकीचा ठेका असलेल्या ठेकेदारावर हजार रुपये दंडाची कारवाई केली. या प्रकाराने ‘गोकुळ’ची दूध चोरी पुन्हा एकदा उघड झाली आहे.

कोट
कागलच्या या प्रकरणात दोन लिटर दूध चोरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे; पण घटना घडल्यानंतर संबंधिताला जाग्यावर दहा हजार दंड केला. यापुढे असले प्रकार घडल्यास कडक कारवाई केली जाईल.
- विश्‍वास पाटील, अध्यक्ष, गोकुळ