डीकेटीईतील राष्ट्रीय स्पर्धेला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीकेटीईतील राष्ट्रीय स्पर्धेला प्रतिसाद
डीकेटीईतील राष्ट्रीय स्पर्धेला प्रतिसाद

डीकेटीईतील राष्ट्रीय स्पर्धेला प्रतिसाद

sakal_logo
By

ich233.jpg
84865
इचलकरंजी ः डीकेटीई इन्स्टिट्यूटमध्ये टेक्स्टव्हीजन, फॅशनोव्हा या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी.

डीकेटीईतील राष्ट्रीय स्पर्धेला प्रतिसाद
`टेक्स्टव्हीजन, फॅशनोव्हा`मध्ये देशभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग

इचलकरंजी, ता. २३ ः डीकेटीई सोसायटीच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये टेक्स्टव्हीजन आणि फॅशनोव्हा ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा अमाप प्रतिसादात झाली. यामध्ये हेल्थ केअर आणि सेफ्टी या विषयावर आधारीत डिझाईन कलेक्शन व प्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशन, आय ऑन पिक ग्लास व स्टार्टेक्स अशा विविध स्पर्धांचा समावेश केला होता. स्पर्धेत दक्षिण पूर्व भारत, मुंबई, हैदराबाद, कोईमतूर, बेंगलोर, कोल्हापूर, तासगांव आदी भागातून विद्यार्थी सहभागी झाले होते.
वस्त्रोद्योग इंडस्ट्रीमध्ये असणारी आव्हाने व त्यावरील उपाय यावर आर संपत यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. स्पर्धेसाठी श्रीकांत पाटील, मंजुनाथ बुर्जी, एस.जे. जावळे, ए.यु. आवसरे, वरदा कलबुर्गी, उमेश बागुल, एम. वाय. गुडियावर, एल.जी.पाटील, ए.ए. रायबागी यांनी परिक्षणाचे काम पाहिले. उपसंचालक प्रा. डॉ. यु. जे. पाटील यांनी स्वागत करताना कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली. त्यांनी लिड स्पॉन्सरर व्हीनस सेफ्टी ऍण्ड हेल्थचे रविंद्र शिंदे व को-स्पॉन्सरर कापसे पैठणी साडी यांची ओळख करुन दिली. डीकेटीईच्या डायरेक्टर प्रा. डॉ सौ. एल.एस. आडमुठे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेवून आपला व आपल्या संस्थेचे नांव उज्वल करावे. आजच्या उद्योगापुढील विविध आव्हाने सांगून हेल्थ ऍण्ड सेफ्टी पूरक वस्त्रोद्योग उत्पादनावर भर द्यावा असे आवाहन रविंद्र शिंदे यांनी केले. संयोजन आर.एच. देशपांडे व व्ही.के. ढंगे यांनी केले. सुत्रसंचालन गिरीराज गटटाणी आणि मिताली चिखले यांनी केले.

कोंडेकर
---6.30---