Tue, March 21, 2023

इचलकरंजीत उद्यापासून खो-खो स्पर्धा
इचलकरंजीत उद्यापासून खो-खो स्पर्धा
Published on : 23 February 2023, 2:45 am
इचलकरंजीत उद्यापासून खो-खो स्पर्धा
इचलकरंजी, ता. २३ ः येथील बालभारत क्रिडा मंडळाच्यावतीने निमंत्रितांच्या पुरुष गटातील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन केले आहे. २५ फेब्रुवारीला दुपारी चार वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. २६ फेब्रुवारीला सात वाजता बक्षीस समारंभ आहे. स्पर्धा रात्र - दिवस होणार असून आठ संघ सहभागी होणार आहेत. सुतार मळा येथे ही स्पर्धा होणार आहे. याबाबतची माहिती अध्यक्ष उल्हास सुर्यवंशी, उपाध्यक्ष विजय जाधव, सचिव आनंदा कौंदाडे, खजिनदार मिलींद नवनाळे यांनी दिली.