
कळंबा पाणीपुरवठ
84913
कोल्हापूर : कळंबा तलावातील पाणी उपशाबाबत महापालिका प्रशासक व अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत आमदार ऋतुराज पाटील तसेच गावातील पदाधिकारी.
कळंबा तलावातील उपसा
कमी करा : ऋतुराज पाटील
पालिकेला सुचना; टाकीसाठी जागेची मागणी
कोल्हापूर, ता. २३ : कळंबा गावाला पाणीटंचाई भासू नये, यासाठी महापालिकेने कळंबा तलावातील उपसा कमी करावा. जलजीवन मिशन योजनेतील टाकीसाठी तलाव परिसरातील जागा द्यावी, अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी केल्या.
कळंबा तलावातून कळंबा गाव, पाचगाव आणि शहराला पाणी दिले जाते. पातळी १८ फुटांवर आली आहे. उन्हाळ्यापूर्वीच पाणी आटत चालल्याने कळंबावासीयांसमोर पाण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. यासाठी आमदार पाटील यांनी कळंबा सरपंच, सदस्य, ग्रामस्थ आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या. या वेळी महापालिका अधिकाऱ्यांनी महिन्याभरात बालिंगा पंपिंग हाऊसमधून आपटेनगर टाकीचे पाणी कळंबा फिल्टर हाऊसला घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कळंबा तलावातील उपसा कमी केला जाईल, असे सांगितले.
अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता हर्षजित घाटगे, कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव, विश्वास गुरव, उपसरपंच उदय जाधव, विकास पोवार, रोहित मिरजे, ग्रामविकास अधिकारी दिलीप तेलवी, दिलीप टिपुगडे, दत्तात्रय तिवले, संग्राम पाटील, उपसरपंच संजय शिंदे उपस्थित होते.