व्हर्टिकल गार्डनचे काम बिंदू चौकात सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हर्टिकल गार्डनचे काम बिंदू चौकात सुरू
व्हर्टिकल गार्डनचे काम बिंदू चौकात सुरू

व्हर्टिकल गार्डनचे काम बिंदू चौकात सुरू

sakal_logo
By

व्हर्टिकल गार्डनचे काम
बिंदू चौकात सुरू
कोल्हापूर, ता. २३ : शहरात वाढलेले धुलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी बिंदू चौकात उभारण्यात येत असलेल्या पहिल्या व्हर्टिकल गार्डनचे काम महापालिकेच्यावतीने सुरू केले आहे. गार्डनसाठी आवश्‍यक असलेल्या लोखंडी स्ट्रक्चरसाठी पाया तयार केला जात आहे.
स्वच्छ हवा कार्यक्रमातून महापालिकेला केंद्र सरकारकडून निधी आला आहे. सध्या धुळीचा प्रचंड त्रास असून त्यामुळे हवेची गुणवत्ता बिघडत चालली आहे. त्याकरिता वर्दळीच्या असलेल्या ठिकाणी व्हर्टिकल गार्डनची उभारणी करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी पर्यटन तसेच स्थानिकांची गर्दी असणारा बिंदू चौक निवडण्यात आला. या चौकातील जुन्या तटबंदीवर गार्डन साकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. सहा फूट उंच व ८० फूट लांबीसाठी २० लाख रूपयांची निविदा मागवली होती. त्यातून निविदा निश्‍चित करून सध्या काम सुरू करण्यात आले आहे.
या गार्डनसाठी लोखंडी स्ट्रक्चर तयार केले जाणार असून त्याच्या पायाचे काम केले जात आहे. स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर त्यात विविध प्रकारची फुलझाडे, शोभेची झाडे लावली जाणार आहेत. ही हिरवाईची भिंत लक्षवेधक तर ठरणार आहेच. शिवाय त्या परिसरातील धुलिकण या हिरवाईवर स्थिरावून हवा शुद्ध होण्यास मदत होणार आहे. या प्रकाराच्या यशस्वीतेनंतर इतर वर्दळीच्या ठिकाणीही अशा गार्डनची उभारणी करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
------
चौकट
स्विपिंग मशीनही घेणार
यंदाच्या वर्षासाठी स्वच्छ हवा कार्यक्रमातून आठ कोटीवर निधी आला आहे. त्यातून हवा स्वच्छतेसाठीची विविध कामे केली जाऊ शकतात. सध्या शहरात धुळीचा प्रश्‍न मोठा आहे. रस्त्यावर धुळीचे ढिग कर्मचारी जमा करतात. पण ते टाकले जात नसल्याने श्रम वाया जात आहेत. त्यावर महापालिका स्विपिंग मशिन खरेदी करण्याचा विचार करत आहे. यापूर्वी भाडेतत्वावर मशीन घेतली होती. आता केंद्र सरकारकडून आलेल्या निधीतून आवश्‍यक असलेली मशीन घेणे शक्य आहे. त्यादृष्टीने विचार चालवला आहे.