महालक्ष्मीची २१ फुटांची भव्य मूर्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महालक्ष्मीची २१ फुटांची भव्य मूर्ती
महालक्ष्मीची २१ फुटांची भव्य मूर्ती

महालक्ष्मीची २१ फुटांची भव्य मूर्ती

sakal_logo
By

महालक्ष्मी उत्सवानिमित्त
देवीची २१ फुटांची मूर्ती
२६ पासून आयोजन; अन्य मूर्तीही आकर्षण
कोल्हापूर, ता. २३ : कृष्णगिरी श्री पार्श्‍व पद्मावती शक्तिपीठाधिपती मंत्र शिरोमणी राष्ट्रीय संत श्री वसंत विजयजी महाराज यांच्या सान्निध्यात २६ फेब्रुवारीपासून कोल्हापुरात होत असलेल्या महालक्ष्मीची २१ फूट उंचीची मूर्ती, आदिलक्ष्मी, धान्यलक्ष्मी आदी देवतांच्या मूर्ती मुख्य आकर्षण असणार आहेत.
‘केरळ’चे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते या महाउत्सवाचे उद्‍घाटन होणार आहे. शिरोली टोलनाका जवळील सुवर्णभूमी लॉन येथे हा महोत्सव ५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. आठ दिवस भाविकांना प्रवेश विनामूल्य असणार आहे. धैर्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि धनलक्ष्मी सहित अष्टभैरव, ज्यामध्ये असितांगभैरव, उन्मतभैरव, भीषणभैरव, चंडभैरव, रुरूभैरव, संहारभैरव, कपालभैरव, क्रोधनभैरव यांच्या दिव्य मूर्तींचे सुवर्णभूमी लॉन्स येथे उद्या (ता. २४) आगमन होत आहे. विशेष शिल्पकारांनी बनवलेल्या दागिन्यांनी सजवलेल्या या अलौकिक मूर्तींचे रूप पाहून मानवी जीवनात मन आनंदी होते, आत्मविश्वास द्विगुणित होईल आणि संकटातून मुक्ती मिळू शकेल. या सर्व मूर्ती २६ फेब्रुवारीपासून भाविकांना पाहता येणार आहेत. २१ फुटांची श्री महालक्ष्मी मूर्ती पूजेसाठी मुख्य व्यासपीठावर विराजमान होणार आहे. २६ फेब्रुवारी ते ५ मार्चपर्यंत रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असून त्याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय पार्श्व पद्मावती सेवा मंडळ आणि पार्श्व पद्मावती सेवा ट्रस्ट कृष्णगिरी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.