कोकणातील मौल्यवान धातू सर्वेक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणातील मौल्यवान धातू सर्वेक्षण
कोकणातील मौल्यवान धातू सर्वेक्षण

कोकणातील मौल्यवान धातू सर्वेक्षण

sakal_logo
By

‘कोकणातील मौल्यवान धातूचे
सर्वेक्षण स्वतंत्र समितीकडून करा’

कोल्हापूर, ता. २३ ः कोकणातील विविध ठिकाणी मौल्यवान धातू असल्याबाबत आता पुन्हा कार्यवाही सुरू झाली असून, त्याचे सर्वेक्षण स्वतंत्र समितीमार्फत व्हावे. ज्या संचालनालयाने ही गोष्ट वर्षानुवर्षे लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला त्याच संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण झाले तर ते निःपक्षपातीपणे होईल, याची खात्री काय, असा सवाल ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी उपस्थित केला.
राज्य शासनाच्या खणिकर्म विभागाकडील सेवानिवृत्त रसायनतज्ञ रामसिंग हजारे यांनी नोकरीमध्ये असताना कोकणातील मातीत मौल्यवान धातू असल्याचे सिद्ध केले होते. पण, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. तरीही त्यांच्याकडून वारंवार पाठपुरावा सुरू होता. अलिकडेच पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या पत्राची दखल घेतली आहे. सहा मार्च २०२२ ला हजारे यांनी पाठवलेल्या एका पत्राची दखल घेत नागपूर येथील संचालनालयाचे उपसंचालक एम. एस. निखारे यांनी कोल्हापूर विभागीय कार्यालयाला दोन दिवसापूर्वी पत्र पाठवले आहे. रेडी, सातेली, तिरोडा, कळणे, दिगवे या परिसराचे मौल्यवान धातूच्या अनुषंगाने तातडीने सर्वेक्षण करून अहवाल पाठवावा, असे त्यात म्हंटले आहे. मात्र, संचालनालयाच्या अधिकाऱ्यांपेक्षा स्वतंत्र समितीमार्फत सर्वेक्षण होणे गरजेचे आहे, असेही कुलकर्णी यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.