Thur, March 23, 2023

भटकी कुत्री बैठक
भटकी कुत्री बैठक
Published on : 24 February 2023, 6:06 am
भटक्या कुत्र्यांबाबत सोमवारी बैठक
कोल्हापूर, ता. २४ : शहरामध्ये भटक्या कुत्र्यांबाबत तक्रारी वाढत आहेत. यासाठी प्राणीप्रेमी संस्था व नागरिकांची सोमवारी (ता. २७) महापालिकेत बैठक बोलवली आहे. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी व तक्रारी स्थानिक पाळीवर निर्गत करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. यासाठी प्राणीप्रेमी संस्था, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, पांजरपोळ संस्था यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन केले आहे. सकाळी अकरा वाजता आयुक्त कार्यालयात होणाऱ्या बैठकीस इच्छुक प्राणीप्रेमी संस्था, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत केले आहे.