‘जयंत पवार यांचे साहित्य’ या विषयावर मंगळवारी चर्चासत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जयंत पवार यांचे साहित्य’ या विषयावर मंगळवारी चर्चासत्र
‘जयंत पवार यांचे साहित्य’ या विषयावर मंगळवारी चर्चासत्र

‘जयंत पवार यांचे साहित्य’ या विषयावर मंगळवारी चर्चासत्र

sakal_logo
By

‘जयंत पवार यांचे साहित्य’
विषयावर मंगळवारी चर्चासत्र
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागातर्फे ‘जयंत पवार यांचे साहित्य’ या विषयावर मंगळवारी (ता. २८) वि. स. खांडेकर भाषाभवन सभागृहात राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्राचे उद्‍घाटन ज्‍येष्ठ कवी प्रफुल्ल शिलेदार यांच्या हस्‍ते होणार आहे. बीजभाषण समीक्षक प्रा. नितीन रिंढे हे करणार आहेत. या चर्चासत्रामध्ये प्रा. गोविंद काजरेकर, आशुतोष पोतदार, प्रभाकर देसाई, राजीव नाईक, किरण गुरव, डॉ. संदीप दळवी, डॉ. माया पंडित-नारकर, प्रवीण बांदेकर, संपत देसाई, प्रमोद मुनघाटे सहभागी होणार आहेत. चर्चासत्राच्या समारोपासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस उपस्थित असणार आहेत, अशी माहिती मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी दिली.