
पत्नी,मुलाचा खून करून पतीची आत्महत्या
११६०- सन्मित संदीप पाटील- मृत
1161- राजश्री संदीप पाटील- मृत
1163- संदीप पाटील- मृत
-----------------------------------------
पत्नी, मुलाचा खून करून
तरुणाची आत्महत्या
---
मुलगी बचावली; कागलजवळ कालव्यात प्रकार
सकाळ वृत्तसेवा
कसबा सांगाव, सांगवडेवाडी, ता. २४ ः पत्नी, मुलगा आणि मुलीला कालव्यात ढकलून स्वतः कर्नाटकात जाऊन एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीजवळ कालव्यात घडला. या प्रकरणी जखमी अवस्थेत असलेल्या मुलीने रात्री उशिरा पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार वडील संदीप अण्णासाहेब पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती कागल पोलिस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी ‘सकाळ’ला दिली. आई, मी, आणि भावाला वडिलांनी कालव्यात ढकलून दिल्याचा जबाब मुलीने ‘सीपीआर’मध्ये उपचार घेत असताना दिला. सविस्तर जबाब उद्या (ता. २५) घेण्यात येणार असल्याचेही ओमासे यांनी सांगितले.
कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील कालव्यात दुपारी ढकलून दिल्याने सौ. राजश्री संदीप पाटील (वय ३२) व सन्मित संदीप पाटील (८, दोघे रा. हलसवडे, ता. करवीर) यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांची मुलगी श्रेया (१४) हिच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू आहेत. तिला पोहता येत होते. स्थानिकांनी दिलेल्या आधारामुळे ती बचावल्याचेही पोलिसांनी सांगितले. घटनेचे गांभीर्य पाहून अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी घटनास्थळी आणि ‘सीपीआर’मध्ये भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान, रात्री उशिरा पती संदीप पाटील यांनी भोज (ता. निपाणी, जि. बेळगाव) येथे आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रथमदर्शनी घरगुती कारणावरून खून करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. उद्या मुलीचा सविस्तर जबाब झाल्यावर याचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः पाटील कुटुंबीय हलसवडे ग्रामपंचायतीच्या मागे राहते. संदीप यांचा डॉल्बी साउंड सिस्टिमचा व्यवसाय आहे. आज दुपारी वडील संदीप यांनी हलसवडे येथील शाळेतून मुलगी आणि मुलाला बॅंकेत जायचे आहे, असे सांगून गाडीवर घेतले. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नीही होती. दरम्यान, दुपारी एकच्या सुमारास कालव्यातील कठड्यावर एक मुलगी मदतीची याचना करताना काही स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ जखमी अवस्थेतील त्या मुलीला बाहेर काढून कसबा सांगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. स्थानिकांनी तिच्याकडे विचारणा करीत असताना तिने मी पोहता येत असल्याने बाहेर आले. वडील, आई आणि लहान भाऊ पाण्यात पडल्याचे सांगितले. ही घटना समजताच कालवा परिसरात नागरिकांनी गर्दी केली. सायंकाळी पाचच्या सुमारास कागल पोलिसांनी पाणबुडीच्या सहाय्याने पाण्यात शोधमोहीम राबवली. यात राजश्री आणि सन्मित यांचे मृतदेह मिळून आले.
चौकट
बाबांनी आम्ही तिघांना कालव्यात ढकलले
उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे तपास करीत आहेत. रात्री उशिरा श्रेया हिच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू असताना तिने मला, भावाला आणि आईला वडिलांनी कालव्यात ढकलल्याचा जबाब दिला. तिला पूर्ण काही सांगता येत नसल्याने उद्या तिचा सविस्तर जबाब घेण्याचे ठरले. मात्र, दिलेल्या जबाबानुसार वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी दिले श्रेयाला जीवदान...
कालवा परिसरात काम करीत असलेल्या मारुती चिखलवाळे, मेहबूब नदाफ, दीपक माने, रियाज कलावंत यांनी क्षणाचाही विलंब न लावता कालव्याकडे धाव घेतली. श्रेयाला बोलता येत नव्हते. आधार देत, थोडी चालवत, तर खोल पाण्यात पाठीवर घेत या चौघांनी तिला पाण्याबाहेर काढले. दुचाकीवरून आरोग्य केंद्रात दाखल केले. आणि पुढील उपचारांसाठी कोल्हापूरला पाठविले. श्रेयाला बोलते केल्यानेच या घटनेचा उलगडा झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.
भोजमध्ये आत्महत्या
मांगूर (ता. निपाणी) : हलसवडे (ता. कागल) येथील तरुणाने भोजजवळ (ता. निपाणी) आत्महत्या केल्याचे शुक्रवारी (ता. २४) रात्री उघडकीस आले. संदीप पाटील (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तत्पूर्वी, मोटारसायकल घेऊन त्याने भोज-भोजवाडी रस्त्यावर येऊन रस्त्याकडेला गळफास घेतला. अंधार पडल्यावर सायंकाळी उशिरा हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. भोजवाडी हद्दीत त्याने गळफास घेतला असला, तरी त्याच्या बाजूला कीटकनाशक औषध असल्याचेही सांगण्यात आले. त्याने औषध प्यायले होते की नाही, हे शवविच्छेदन झाल्यावर कळणार आहे. सदलगा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. सदलग्याचे पोलिस उपनिरीक्षक भरतेश यांच्याशी संपर्क साधला असता तरुणाने गळफास घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबतचे कारण नातेवाइकांच्या जबाबानंतर कळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या ठिकाणी चिठ्ठी वगैरे काही मिळाले आहे काय, याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती मिळू शकली नाही.
हलसवडेत दुकाने बंद
हलसवडे येथे ही बातमी समजताच गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. चौकाचौकांत या घटनेची चर्चा सुरू झाली. ‘डीजे’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या संदीप याने असे का केले असावे, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. तो ‘डीजे’चा व्यवसाय करून शेती, भाजीपाला उत्पादन घेत होता. रात्री एकपर्यंत तिघांचे मृतदेह गावात आणलेले नव्हते. मुलीला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे स्थानिकांनी सांगितले.
श्रेया एकटीच
चौकोनी कुटुंबातील श्रेया आता एकटीच राहिली आहे. आई, भावाचा खून झाला; तर वडिलांनी आत्महत्या केली. आता तिला आजी आणि आजोबांचाच आधार आहे. त्याचीही चर्चा परिसरात होती.
फोटोओळ
जखमी श्रेया (पांढरी ओढणी बांधलेली), मृत राजश्री, मृत सन्मित
----------------------
काय घडले?
० कुटुंबीय हलसवडे (ता. करवीर) गावचे
० कागल ‘एमआयडीसी’जवळ मायलेकाचा कालव्यात मृतदेह
० पोहता येत असल्याने मुलगी बचावली
० तिला स्थानिकांनी पाण्याबाहेर काढत रुग्णालयात हलविले
० निपाणी तालुक्यात महिलेच्या पतीची आत्महत्या
---------------------