कोंबड्याच्या चाव्यामुळे इजा झालेल्या मुलीवर शस्त्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Surgery
जाहिरात बातमी

Kolhapur News : कोंबड्याच्या चाव्यामुळे इजा झालेल्या मुलीवर शस्त्रक्रिया

कोल्हापूर - चार वर्षांच्या मुलीचा कोंबड्याने चावा घेतला. यानंतर लगेचच तिच्या चेहऱ्यावर, छातीवर, मानेवर सूज आली. ही सूज हळूहळू वाढू लागली. तिला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

सुरवातीच्या तपासण्यांनंतर मुलीच्या मानेच्या खालच्या भागावर लहान चाव्याचे चिन्ह आढळले आणि मुलीच्या संपूर्ण मानेवर, छातीवर सर्जिकल इम्फायसीमा आढळला आणि हळूहळू तो डोळ्यांखालील पापण्यांवरसुद्धा वाढत गेला. कोंबड्याने घेतलेल्या चाव्यामुळे मुलीच्या श्‍वासनलिकेला छिद्र पडले होते. डॉ. अमितकुमार जाधव यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि त्यानंतर मुलीच्या शरीरावरील सूज हळूहळू कमी झाली. सर्जरीनंतर चौथ्या दिवशी मुलीला डिस्चार्ज देण्यात आला.

डॉ. जाधव म्हणाले, ‘कोंबड्याने घेतलेल्या चाव्यामुळे श्‍वसनलिकेला इजा होणे, अशाप्रकारची केस जगभरात पाहिली गेली नाही. वेळीच हॉस्पिटलमध्ये आल्यामुळे आम्हाला योग्य निदान लगेच करता आले. गेली अनेक वर्षे अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलच्या पेडिअ‍ॅट्रिक सर्जरी विभागात गुंतागुंतीच्या अनेक केसेस आम्ही पाहतो, परंतु ही खूपच विशेष केस होती. अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित पाटील व डॉ. गोपाळ वसगावकर यांचे सहकार्य मोलाचे ठरले.’

टॅग्स :KolhapursurgeryChildren