विकासाचा बॅकलॉग भरुन काढू; खासदार मंडलिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासाचा बॅकलॉग भरुन काढू; खासदार मंडलिक
विकासाचा बॅकलॉग भरुन काढू; खासदार मंडलिक

विकासाचा बॅकलॉग भरुन काढू; खासदार मंडलिक

sakal_logo
By

85410
जरळी : नळ पाणी योजना कामाचा प्रारंभ संजय मंडलिक यांच्याहस्ते झाला. यावेळी राजेश पाटील, सागर पाटील, अमर चव्हाण, रामाप्पा करिगार आदी उपस्थित होते.

विकासाचा बॅकलॉग भरुन काढू
खासदार मंडलिक; जरळीत जलजीवन पाणी योजनेचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
नुल, ता. २६ : राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री आमचे असतानाही शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना विकासनिधी मिळाला नाही. उर्वरित काळात विकासनिधी मिळविण्यासाठीच आम्ही शिंदे गटात प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत मतदारसंघातील विकासाचा बॅकलॉग पूर्णपणे भरुन काढण्याची ग्वाही खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
जरळी (ता. गडहिंग्लज) येथे जलजीवन मिशन अंतर्गत दोन कोटी सात लाखाची नवीन नळ पाणी योजना कामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. आमदार राजेश पाटील अध्यक्षस्थानी होते. सरपंच सागर पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष रामाप्पा करिगार, अमर चव्हाण, अभय देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार मंडलिक व आमदार पाटील यांच्याहस्ते पाणी योजना कामाचा प्रारंभ झाला. दरम्यान, उपसरपंचपदी निवडीबद्दल संजय तोरस्कर व ग्रामसेवक सुरेश गुरव यांचा मंडलिक यांच्याहस्ते सत्कार झाला.
मंडलिक म्हणाले, ‘‘मतदारसंघातील १०३५ गावातील जलजीवन पाणी योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. रस्ते आणि पाणी योजनांसाठी आता निधीची अडचण भासणार नसल्याचे सांगून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे येथूनच रणशिंग फुंकत असल्याचे त्यांनी जाहीर केले.’’
आमदार पाटील म्हणाले, ‘‘खासदार मंडलिक व मी विकासकामांना गती दिली आहे. नेते हसन मुश्रीफ विकासासाठी आमच्यामागे हिमालयासारखे उभे आहेत. जनतेला दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करण्यात कमी पडणार नाही.’’ नारायण चव्हाण, अमर चव्हाण, दत्ता देशपांडे यांची भाषणे झाली. भिमगोंडा पाटील यांनी स्वागत तर टी. एम. दुंडगे यांनी प्रास्ताविक केले. पी. के. पाटील, अनिकेत कोणकेरी, बाबूराव चौगुले, बाबासाहेब पाटील, काकासाहेब दुंडगे, शिवाजी माने, ग्रामसेवक सुरेश गुरव, ए. बी. केंबळे, शिवाजी बागडी व ग्रामस्थ उपस्थित होते. विठ्ठल चौगुले यांनी आभार मानले.