नाविन्यपूर्ण उपक्रमांतून मुलांचे सांस्कृतिक मन घडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाविन्यपूर्ण उपक्रमांतून मुलांचे सांस्कृतिक मन घडवा
नाविन्यपूर्ण उपक्रमांतून मुलांचे सांस्कृतिक मन घडवा

नाविन्यपूर्ण उपक्रमांतून मुलांचे सांस्कृतिक मन घडवा

sakal_logo
By

85476)
......

नावीन्यपूर्ण उपक्रमांतून मुलांचे सांस्कृतिक मन घडवा
डॉ. यशवंत पाटणे; जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे पुरस्कार वितरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ः `आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून मराठी भाषेने विश्र्वाशी नाते जोडले आहे. काळाची पावले ओळखून मराठी माध्यमाच्या शाळांनी गुणात्मक दर्जा जोपासला पाहिजे. मराठी विषय शिक्षकांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून मुलांचे सांस्कृतिक मन घडवावे. जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी शिक्षकांनी ग्रंथव्यासंग जोपासला पाहिजे’, असे प्रतिपादन लेखक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी आज येथे केले.
येथील कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे आयोजित कोजिम प्रेरणा पुरस्काराच्या वितरणाप्रसंगी ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनमधील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुदरगडचे गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे होते. डॉ. पाटणे म्हणाले, ‘समाज आणि संस्कृतीच्या विकासासाठी मातृभाषा प्रेरक असते. मुलांना जे ज्ञान मातृभाषेतून मिळते. त्याला संस्कृतीचा सुगंध असतो. सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी मातृभाषेशिवाय पर्याय नाही. पुरस्कार म्हणजे गुणवत्तेची कदर असते. त्यातून भविष्यासाठी प्रेरणा मिळते.’
या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख उपस्थितांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नाट्यछटा आणि निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. यावेळी अध्यापक संघाचे उपाध्यक्ष पी. डी. पाटील, कार्याध्यक्ष नेताजी डोंगळे, कार्यवाहक विजय सरगर, उपाध्यक्ष पी. डी. पाटील, माजी अध्यक्ष बी. एस. कांबळे आदी उपस्थित होते. मनीषा डांगे यांनी स्वागत केले. अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. सचिन यादव यांनी सूत्रसंचालन केले. अरुण कुंभार यांनी आभार मानले.
...

जिल्ह्यातील १८ शिक्षकांचा गौरव

या कार्यक्रमात अध्यापक संघातर्फे एकूण १८ शिक्षकांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यात राजेंद्र पाटील, दिलीप पाटील, निशा साळोखे (कोजिम गौरव पुरस्कार), मंगल रूकडीकर, शामराव पाटील, रघुनाथ कांबळे, बबन कानकेकर, बाबासाहेब माने, शोभा कुंभार, वैजनाथ सुतार, प्रज्ञा देसाई, सीमा कागवाडे, बाळासाहेब मोटे, महालिंग मिठारी, बाबासाहेब चौगले, अरविंद चव्हाण, संभाजी चव्हाण, नीळकंठ कुराडे (कोजिम प्रेरणा पुरस्कार), ग्रंथपाल राजेंद्र नाईकवडी (कोजिम वाचन प्रेरणा पुरस्कार) यांचा समावेश होता. सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र, पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप होते.