Tue, March 21, 2023

हिटणीत मारहाण
हिटणीत मारहाण
Published on : 26 February 2023, 5:23 am
हिटणीत लोखंडी पाईपने
मारहाणीत एक जखमी
गडहिंग्लज : हिटणी (ता. गडहिंग्लज) येथे किरकोळ कारणावरुन लोखंडी पाईप व काठीने झालेल्या मारहाणीत राजेंद्र मारुती राचोटी हा जखमी झाला. याप्रकरणी गावातीलच प्रकाश मलाप्पा माळगी व सर्जन प्रकाश माळगी या दोघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. साखरे यांच्या शेतात ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, राजेंद्र व त्याची पत्नी दोघेही शेतात लाकडे रचून ठेवत होते. त्यावेळी प्रकाश व सर्जन हे काठी व लोखंडी पाईप घेवून तेथे आले. तू माझ्याबद्दल कोणाला काय सांगितलास, तू मला त्यांच्यासमोर शिविगाळ का केलीस, असा जाब विचारत राजेंद्रच्या डाव्या हातावर प्रकाशने काठीने मारले तर सर्जनने लोखंडी पाईपने उजव्या पायावर मारहाण केली. त्यात राजेंद्र जखमी झाला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.