
इचलकरंजीत गुरुवारी शिवगर्जना मेळावा
इचलकरंजीत गुरुवारी शिवगर्जना मेळावा
इचलकरंजी, ता. २७ ः शहरात शिवगर्जना मेळाव्यांतर्गत मार्गदर्शन करण्यासाठी खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. मेळावा गुरुवारी (ता. २) येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात सकाळी दहा वाजता होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गतवैभव आणण्यासाठी राज्यात शिवगर्जना मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, जिल्हा उपप्रमुख महादेव गौड यांनी पत्रकार परिषदेत दिली. मेळाव्यात खासदार राऊत यांच्याबरोबर उपनेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, प्रा. लक्ष्मण हाके, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. शहरप्रमुख सयाजी चव्हाण, तालुकाप्रमुख आनंदा शेट्टी, शिवाजी पाटील, अण्णासो बिल्लुरे, मलकारी लवटे, महेश बोहरा, सलोनी शिंत्रे, आप्पा पाटील आदी उपस्थित होते.