
भवानीमाता महिला प्रशिक्षण संस्थेत प्रदर्शन
85584
गडहिंग्लज : भवानीमाता संस्थेतील प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर एम. एल. चौगुले यांचा सत्कार सीमा साळुंखे यांनी केला. या वेळी महेश मजती उपस्थित होते.
भवानीमाता महिला
प्रशिक्षण संस्थेत प्रदर्शन
गडहिंग्लज, ता. २७ : येथील भवानीमाता महिला स्वावलंबन प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थींनी बनविलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन उत्साहात झाले. श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. राष्ट्रीय सहकारी संघाच्या सहायक नीतू लांबा यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रदर्शनात एनसीडीसी व युवा परिवर्तन प्रायोजित फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या युवती व महिलांनी तयार केलेले कपडे, साडी, पडदे आदी वस्तू मांडण्यात आल्या होत्या. महिलांच्या कलाकुसरीचे कौतुक चौगुले यांनी या वेळी केले. या वेळी भवानीमाता संस्थेतर्फे फॅशन डिझायनिंग, शिवणकाम, ब्युटी पार्लर, मेहंदी, मसाले, योगा, झुंबा, गृहसजावट, फ्लॉवर मेकिंग पेटिंग आदींसह विविध हस्तकला व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती संस्थेच्या प्रमुख सीमा साळुंखे यांनी सांगितले. या वेळी रवळनाथचे संचालक महेश मजती, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. के. मायदेव, प्रशासन अधिकारी सागर माने आदीसह महिला व युवती उपस्थित होते. साळुंखे यांनी आभार मानले.