हरकती १० मार्चपर्यंत द्या, आजरा नगरपंचायतीचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरकती १० मार्चपर्यंत द्या, आजरा नगरपंचायतीचे आवाहन
हरकती १० मार्चपर्यंत द्या, आजरा नगरपंचायतीचे आवाहन

हरकती १० मार्चपर्यंत द्या, आजरा नगरपंचायतीचे आवाहन

sakal_logo
By

हरकती १० मार्चपर्यंत द्या
आजरा नगरपंचायतीचे आवाहन; विकास आराखड्याबाबत चर्चा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २७ : १० मार्चपर्यंत आपआपल्या क्षेत्राबाबत नागरिकांनी हरकती द्याव्यात. पूर्वीचे ज्यांचे गट एनए (अकृषक) केले आहेत. त्यांच्यावर वेगळे आरक्षण पडले आहे. त्यांनी आपल्या आदेशासह हरकती घ्याव्यात, असे आवाहन आजरा नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.
येथील नगरपंचायत सभागृहात विकास आराखड्याबाबत (डी. पी. प्लॅन) याविषयी चर्चा झाली. नगररचना संचलनायातर्फे आजरा शहराचा प्रारुप विकास आराखडा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात अनेक त्रुटी असल्याचे नागरिकांचे मत आहे. त्यामुळे विकास आराखड्या त्रूटी दूर करण्याची मागणी आजरा शहरातील नागरिकांनी केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर नगरसेवक, प्रशासनाच्या सोबतच्या नागरिकांची आज बैठक झाली. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या.
भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी नदीशेजारी पूरग्रस्त रेषा असणाऱ्या ठिकाणी रहिवासी आरक्षण टाकल्याप्रकरणी नाराजी व्यक्त करत यात बदल करण्याची मागणी केली. असिफ पटेल यांनी शहराच्या सांडपाणी व्यवस्थेबाबत विकास आराखड्यात कोणतेही नियोजन नसल्याचे सांगितले.
नगरसेवक अभिषेक शिंपी म्हणाले, ‘‘पूररेषेबाबत एलो झोन व नगरपंचायतकडून दिली जाणारी बांधकाम परवानगी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पूररेषेबाबत नगरपंचायतीला काळजी घ्यावी लागेल. झोन कुठलाही असला तरीही हिरव्या पट्यात बांधकाम करता येते. त्याचबरोबर सार्वजनिक जांगासाठी जर काय चुकीचे आरक्षण पडले असेल त्या संदर्भात समाजप्रतिनिधीनी किंवा संबंधित क्षेत्रातील नागरीकांनी लेखी मागणी करावी.’’ नगराध्यक्षा चराटी, ज्येष्ठ नगरसेवक अशोक चराटी तसेच प्रशासनातर्फे साईश गोटेकर, प्रदीप नाईक यांनी उत्तरे दिली. तसेच नागरिकांच्या तक्रारींचे व शंकांचे निरसन झाल्याशिवाय आरखड्याला अंतिम स्वरूप देणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले.
उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव, नगरसेवक संभाजी पाटील, किरण कांबळे, शुभदा जोशी, सुमैय्या खेडेकर, अनिरुद्ध केसरकर, यांच्यासह नगरसेवक, तसेच उदयराज चव्हाण, राजू विभूते, आनंदा फडके, डॉ. प्रवीण निंबाळकर, शाम भुईंबर, बंडोपंत चव्हाण, शंकरराव शिंदे, नागरिक उपस्थित होते.
------------
चौकट
सांडपाणी रोखा
दरम्यान, समीर मोरजकर यांनी हिरण्यकेशी नदीत थेट सांडपाणी मिसळत असल्याने पाणी नदीत जाण्याआधी शोषखड्डे तयार करावे, असे सांगितले. या वेळी उपस्थित नागरिकांनी रस्ते, खुल्या जागा याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले.