चेंबर निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चेंबर निवेदन
चेंबर निवेदन

चेंबर निवेदन

sakal_logo
By

85699

परवाना, फायरसेसमधील त्रुटी
दुरुस्त करून अंमलबजावणी करावी

‘कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स’ची महापालिकेकडे मागणी

कोल्हापूर, ता. २७ : यंदाचे अंदाजपत्रक करीत असताना कोरोनातील निर्बंध, महापूर, मॉल व ई-कॉमर्स व्यापारामुळे सामान्य व्यापाऱ्यांवर आलेली गदा या साऱ्यांचा विचार व्हावा. परवाना, फायरसेसमधील त्रुटी दुरुस्त करून अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे व्यक्त केल्या.
निवेदनात म्हटले आहे, व्यवसाय परवाना फी २०१९-२० मध्ये वाढ करुन दिली आहे. ती पाच वर्षे ठेवावी असे ठरले असताना १० टक्के वाढ सुचविली असल्याचे दिसते. परवाना फी पूर्वीप्रमाणेच ठेवावी. नुतनीकरण विलंब फी दहा टक्के असावी. परवाना फी चे दर व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता ठरविली आहे हे चुकीचा आहे. फेरफार फी एक वर्षाची न आकारता किरकोळ आकारावी. फायरसेसचा चुकीचा अर्थ काढून सरसकट लावण्याचा प्रयत्न केला आहे. दोन वर्षे पाठपुरावा करत आहे. चुकीचा फायरसेस ताबडतोब मागे घ्यावा. व्यवसाय परवाना व फायरसेस विभाग वेगळा करावा. अन्यथा दोन्हीही व्यापारी भरणार नाहीत. व्यावसायिक पाणीपट्टीचा स्थिर आकार पूर्वीप्रमाणे ठेवावा. स्थानिक संस्था कराच्या असेसमेंट बंद कराव्यात व या विभागामार्फत कोणतेही उत्पन्न दाखवू नये, स्थानिक संस्था कर विभाग बंद करावा. शहरातील सर्व मिळकतींचा सर्वेक्षण करुन त्यांना घरफाळा बसविला जात नाही तोपर्यंत घरफाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करु नये. २०२१ मध्ये ज्या भागात महापूर आला होता त्या घरफाळ्यामध्ये सूट मिळावी. सरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्किंग ताबडतोब सुरू करावे. जिथे पार्किंग आरक्षण टाकले आहे त्याठिकाणी पे ॲंड पार्कची अंमलबजावणी सक्षमपणे करावी. गाळेधारकांचे जुने भाडे शासनाच्या ६ एप्रिलच्या परिपत्रकाप्रमाणे २०१५ च्या प्रचलित भाड्याप्रमाणे भरुन घ्यावे. टिंबर मार्केटचा फायनल ले-आऊट केला नसल्याने त्या जागेचे स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड तसेच नकाशा उपलब्ध होत नाही. टिंबर व्यापारी असोसिएशनसमवेत आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासोबत बैठका घेतल्या. अंतिम रेखांकन मंजूरीसाठी नकाशा नगररचना विभागाकडे सादर केला आहे. त्यावर कार्यवाही झालेली नाही. ती तातडीने करावी. शिष्टमंडळात चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष संजय पाटील, हरी पटेल, प्रशांत शिंदे, अजित कोठारी, संपत पाटील, राहुल नष्टे, संभाजीराव पोवार, अनिल धडाम, अविनाश नासिपुडे, मोहन पटेल आदी उपस्थित होते.