
ठाकरे मेळावा
ठाकरे गटाचा उद्या
‘शिवगर्जना’ मेळावा
खासदार संजय राऊत यांची उपस्थिती
कोल्हापूर, ता. २७ ः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा उद्या (ता. १) कोल्हापुरात मेळावा होणार आहे. सायंकाळी पाच वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात होणाऱ्या या मेळाव्याला सेना नेते खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर कोल्हापुरात होणाऱ्या या पहिल्याच मेळाव्याला ‘शिवगर्जना’ असे नाव दिले असून या मेळाव्यात आगामी निवडणुकीचे रणशिंग ठाकरे गटाकडून फुंकले जाणार आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर या मेळाव्याच्या निमित्ताने श्री. राऊत हे पहिल्यांदाच कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून जिल्ह्यातील दोन्ही खासदारांसह शिंदे गटात केलेल्या आजी-माजी आमदारांना लक्ष्य केले जाणार आहे. या मेळाव्याला शिवसेना उपनेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, प्रवक्ते लक्ष्मण हाके, आमदार बाबूराव माने, युवतीसेना सुप्रदा फातर्पकर, युवासेना विक्रांत जाधव, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आदी उपस्थित रहाणार आहेत. या मेळाव्याला ठाकरे गटाच्या शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले.