
अंबाबाई मंदिर देणगी पेट्या
अंबाबाई मंदिरातील
दानपेट्यांची मोजदाद सुरू
कोल्हापूर, ता. २७ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांची मोजदाद आजपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी ४६ लाख ९७ हजार रुपयांची मोजदाद पूर्ण झाली असून, आणखी पाच ते सहा दिवस मंदिरातील गरुड मंडपात ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांची संख्या वाढत असल्याने दानपेट्या मोजदादीसाठी उघडण्यात आल्या आहेत. मंदिरात एकूण १४ दानपेट्या असून, त्यातील चार क्रमांकाची पेटी आज खुली करण्यात आली. एकूण ४६ लाख ९७ हजार इतक्या रकमेची मोजदाद झाली. त्यात एक लाख ४३ हजार ३३० रुपयांच्या चिल्लरचा समावेश आहे. त्याशिवाय, दहा ते बारा परकीय नोटा, दागिनेही असून, त्याचे मूल्यांकनही केले जाईल.
...
ती गाडी बॅंकेची...
चोख सुरक्षा यंत्रणा राबवून मंदिरातील दानपेट्या मोजदादीसाठी खुल्या केल्या जातात. सायंकाळनंतर मोजदाद केलेली रक्कम घेऊन जाण्यासाठी बॅंकेची गाडी मंदिरात येते. आज रात्री याच गाडीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि गाडी थेट मंदिरात कशी, त्यासाठी परवानगी घेतली गेली आहे का, अशी चर्चा सोशल मीडियावरून सुरू झाली. त्यामुळे ही गाडी बॅंकेची असून, देणगी रक्कम नेण्यासाठी आली होती, असा खुलासा व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी केला.