Tue, March 28, 2023

आजरा ः पोलीस वृत्त
आजरा ः पोलीस वृत्त
Published on : 27 February 2023, 6:14 am
विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू
आजरा ः मडिलगे (ता. आजरा) येथे विहिरीत पाय घसरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दिनकर जानबा कडगावकर (वय ५८) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. संभाजी कडगावकर यांनी याबाबत आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे. व्हडगेवाडी नावाच्या शेतात ते लाकडे तोडण्यासाठी गेले असता ते विहिरीत पडले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे.