Fri, March 31, 2023

आयसोलेशनजवळ चाकूहल्ला
आयसोलेशनजवळ चाकूहल्ला
Published on : 27 February 2023, 6:43 am
दारू देण्याच्या कारणावरून चाकूहल्ला
कोल्हापूर ः दारू देण्याच्या कारणावरून आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात सोमवारी (ता. २७) दुपारी काही जणांनी केलेल्या चाकूहल्ल्यात मंगळवार पेठेतील तरुण गंभीर जखमी झाला. सुनील कृष्णात वागे (वय ३२, रा. मंगळवार पेठ) असे त्याचे नाव आहे. दुपारी चारच्या दरम्यान हा प्रकार घडला. राजारामपुरी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, चिले कॉलनीतील गणेश चव्हाण, बाबू रानमाळे, नीलेश अनगोळकर, प्रमोद पाटील यांनी वागे याला आयसोलेशन हॉस्पिटलजवळ बोलावले. तिथे वागे व त्यांच्यात दारूच्या कारणावरून वाद झाला. त्यातून वागे याच्यावर चाकूहल्ला झाला. त्याच्या डोक्याला, चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून, ‘सीपीआर’मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.