
तृणधान्य पाक कला स्पर्धेस गडहिंग्लज येथे प्रतिसाद
85801
गडहिंग्लज : कृषी विभाग व मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित तृणधान्यापासून पाक कला स्पर्धेत विविध पदार्थांसह महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
तृणधान्य पाक कला स्पर्धेस
गडहिंग्लज येथे प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त विविध तृणधान्यापासून बनवण्यात आलेल्या पाक कलेच्या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. शासनाचा कृषी विभाग, मराठी विज्ञान परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा झाल्या. उपविभज्ञगीय कृषी अधिकारी सतीश रोकडे अध्यक्षस्थानी होते.
बाजरी, ज्वारी, नाचणा, राळा आदी तृणधान्यापासून विविध पौष्टीक पदार्थ महिलांनी तयार करुन स्पर्धेत सादर केले होते. नाचणीपासून मोदक, वडे, लाडू, आंबोळी, ढोकळा आदी पदार्थ बनविले होते. श्री. रोकडे यांनी कुटूंबाचे आरोग्य महिलांच्या हातामध्ये असून प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेमधून महिला गटाच्या माध्यमातून व्यावसायिक स्वरुपात या पदार्थांचे रुपांतर करण्याचे आवाहन केले. आहार तज्ञ डॉ. नलिनी सुलतानपुरे यांनी तृणधान्यातील पोषण घटकांची माहिती दिली. उज्ज्वला दळवी व डॉ. सुलतानपुरे यांनी परीक्षण केले.
विज्ञान परीषदेचे कार्यवाह डॉ. एस. के. नेर्ले यांनी स्वागत केले. डॉ. एन. डी. सावंत यांनी आभार मानले. तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे, मंडल कृषी अधिकारी रंजना देशमुख, हरिदास बोंगे, पर्यवेक्षक अरुण खोत, आनंद पाथरवट, हरिश्चंद्र सिताप, विश्वनाथ धूप, बसाप्पा आरबोळे, घाटगे, राजाराम आजगेकर, कृषी सहायक अनिल कांबळे, सचिन नाईक, किशोर धोंडगे, नंदकुमार धनगहू, अविनाश यादव, सुरेखा शिंदे, विद्या मांगले, स्नेहल पाटील, दिपाली कुंभार, पल्लवी कोकीतकर यांनी नियोजन केले होते.