पीएम किसान निधीत भरीव वाढीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएम किसान निधीत भरीव वाढीची मागणी
पीएम किसान निधीत भरीव वाढीची मागणी

पीएम किसान निधीत भरीव वाढीची मागणी

sakal_logo
By

पीएम किसान निधीत
भरीव वाढीची मागणी
किसान संघाचे मंत्री शिंदेंना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : पी. एम. किसान निधीमध्ये भरीव वाढ करण्याची मागणी गडहिंग्लज तालुका भारतीय किसान संघाच्या शिष्टमंडळाने केली. याबाबत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
सध्या केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळत असलेले पी. एम. किसान निधी हा अत्यल्प असून, वाढती महागाई लक्षात घेता त्यात भविष्यात भरीव वाढ होण्याची आवश्यकता आहे. शेतमालाचा भाव निश्‍चित करण्यासाठी त्या पिकाचा उत्पादन खर्च अधिक उत्पादकाला 35 टक्के लाभ मिळाला पाहिजे, असा धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली. केंद्रीय मंत्री या नात्याने कृषी खात्याकडे या मागणीची शिफारस करावी अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
सचिन जाधव, राम पाटील, उमाशंकर मोहिते, शिवाजी चौगुले, अमरनाथ घुगरी, चंद्रशेखर मोळदी, अण्णासाहेब नेवडे, आप्पा भोसले, रघुनाथ चौगुले, सोमाण्णा चौगुले, आप्पा बागे, आप्पासाहेब पाटील यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.