एमआयएम पत्रकार परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमआयएम पत्रकार परिषद
एमआयएम पत्रकार परिषद

एमआयएम पत्रकार परिषद

sakal_logo
By

समाजकंटकांवर कारवाईची एमआयएमची मागणी

कोल्हापूर : विशाळगडावरील मलिक रेहान साहब दर्गाह परिसरात उन्माद माजवणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम)चे जिल्हा उपाध्यक्ष इलियास कुन्नुरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. विशाळगड परिसरात जे कोणी अवैध व्यवसाय करत असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, असेही ते म्हणाले. कुन्नुरे म्हणाले, ‘महाराष्ट्र, कर्नाटकासह अन्य राज्यांतील लाखो भाविकांचे मलिक रेहान साहब दर्गाह श्रद्धास्थान असून, दर्गाहला कायमस्वरूपी पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करावी. दर्गाहची देखभाल व सेवा करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. दर्गाह परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करावी.’ पत्रकार परिषदेस मोहसीन हकीम, जुबेर पठाण, जावेद बारगीर, सुमैया पत्रेवाले उपस्थित होते.