महापालिकेच्या भूखंडावर बँकेकडून कर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या भूखंडावर बँकेकडून कर्ज
महापालिकेच्या भूखंडावर बँकेकडून कर्ज

महापालिकेच्या भूखंडावर बँकेकडून कर्ज

sakal_logo
By

महापालिकेच्या भूखंडावर बँकेकडून कर्ज
दीपक ढेरे; जिल्हाधिकारी, आयुक्तांकडे चौकशीची मागणी

इचलकरंजी, ता.२८ ः महापालिकेने बगीचा म्हणून विकसीत केलेल्या खूल्या भूखंडावर सन्मती सहकारी बँकेने कर्ज दिले आहे, अशी माहिती माजी नगरसेवक दीपक ढेरे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे. कर्ज थकल्यानंतर बँकेने या खुल्या भूखंडाचा ताबा घेण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी पातळीवर सुरु केली आहे. या कर्ज प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केल्याचेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.
बँकेने शंकरन विव्हींग इंडस्ट्रीज व इतर दोन अशा तीन कंपन्यांना २०१८ मध्ये पाऊण कोटींचे कर्ज दिले होते. त्यासाठी सि. स. क्र. १७८००, १७८०१, १७८०२ व १७८०३ या मिळकती तारण घेतल्या होत्या. पैकी १७८०३ ही मिळकत महापालिकेच्या मालकीची आहे. ही मिळकत खुला भूखंड असून त्यावर महापालिकेने बगीचा विकसीत केला आहे. तसेच या जागेवर वॉटर ट्रिटमेंट प्लॅन्ट आहे. असे असताना बँकेने ताबा नोटीस प्रसिद्ध करुन प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. आता प्रत्यक्षात ताबा देण्याचे आदेश व्हावेत, यासाठी बँकेने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला आहे, असे पत्रकात नमूद केले आहे.
-------------
आरोप चुकीचा, खोट्या माहितीच्या आधारे ः सन्मती बँक
ढेरे यांनी केलेला आरोप चुकीचा व खोट्या माहितीच्या आधारे केला आहे. सि. स. क्र. १७८०३ ही स्थावर मिळकत ११६० चौरस मीटर असून त्यापैकी १४५ चौरस मिटर इतकेच तारण घेवून कर्ज अदा केले आहे. उर्वरीत क्षेत्राचा बँकेचा काहीही संबंध नाही. बँक थकीत कर्ज वसुलीची प्रक्रिया कायदेशीर सल्लागारामार्फत राबवत आहे.
-महेश कुंभार, बोर्ड सेक्रेटरी, सन्मती सहकारी बँक