कमी दिवसात जास्त उत्पादन घेण्यासाठी गाळप क्षमता वाढवा; विजय औताडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कमी दिवसात जास्त उत्पादन घेण्यासाठी गाळप क्षमता वाढवा; विजय औताडे
कमी दिवसात जास्त उत्पादन घेण्यासाठी गाळप क्षमता वाढवा; विजय औताडे

कमी दिवसात जास्त उत्पादन घेण्यासाठी गाळप क्षमता वाढवा; विजय औताडे

sakal_logo
By

कमी दिवसात जास्त उत्पादन
घेण्यासाठी गाळप क्षमता वाढवा
विजय औताडे; ‘आजरा’च्या हंगामाची सांगता
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २८ : पुर्वीच्या काळी साखर कारखान्याचा गळीत हंगाम पाच ते सहा महिने चालायचा. आता तशी स्थिती राहिली नाही. त्यामुळे कमी दिवसात जास्तीत जास्त साखर उत्पादन घेण्यासाठी गाळप क्षमता वाढवावी लागेल. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी लागेल, असे मत साखर उद्योगाचे अभ्यासक विजय औताडे यांनी व्यक्त केले.
गवसे (ता. आजरा) येथे आजरा साखर कारखान्याचा गळीत सांगता समारंभ झाला. या वेळी ते बोलत होते. औताडे व मान्यवरांच्या हस्ते साखर पोत्यांचे पुजन झाले. कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे व त्यांच्या पत्नी श्रध्दा शिंत्रे यांच्या हस्ते सत्यनारायण पुजा झाली.
औताडे म्हणाले, ‘‘व्यवस्थापनाने चार लाख टन गळीताचे उद्दीष्ट ठेवले होते. अती पावसामुळे ऊस उताऱ्यात दहा टक्के घट झाली. तोडणी वाहतुक कंत्राटदारांनी राज्यातील बऱ्याच कारखान्यांना करार करुन पुरेशी यंत्रणा पुरवली नाही. त्याचा फटका गळीताला बसला आहे. आजऱ्याने सर्व परिस्थितीला तोंड देत तीन लाख ३६ हजार टनाचे गाळप केले. चार लाख ६९ हजार क्विंटल साखर उत्पादित केली. १२.११ क्के साखर उतारा झाला. हे कौतुकास्पद आहे. कारखान्याने उपपदार्थ निर्मितीकडे वळावे, इथेनॉल निर्मिती व डिस्टीलरी प्रकल्प वेळेत पुर्ण करावा.’’ प्रा. शिंत्रे म्हणाले, ‘‘कारखान्याने ऊस बिले, तोडणी वाहतुक बिले व कामगारांचे पगार वेळेत अदा केले आहेत. कारखान्याकडे देय असलेली बिले वेळेत अदा केली जातील. कारखान्यावर सभासद, शेतकऱ्यांनी विश्वास दाखवला.’’ या ळी संचालक अशोक चराटी, जनाताई रेडेकर, दिगंबर देसाई, दशरथ अमृते, मलिककुमार बुरुड, अनिल फडके, कार्यकारी संचालक टी. ए. भोसले, जनरल मॅनेंजर (टेक्नो) व्ही. एच. गुजर, प्रोडक्शन मॅनेंजर अरविंद चव्हाण, सचिव व्ही. के. ज्योती, रमेश वांगणेकर, विठ्ठल पाटील उपस्थित होते.
-------------
चौकट
‘आजरा’ची निवडणुक बिनविरोध करा
आजरा कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता येथे घेण्यात येणारे निर्णय एकमुखी झाले पाहिजेत. त्यामुळे कारखान्याची निवडणुक बिनविरोध करून आर्थिक नुकसान टाळावे, असे आवाहनही औताडे यांनी केले.