ज्योतिरादित्य सिंधिया विमातळ बैठक बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्योतिरादित्य सिंधिया विमातळ बैठक बातमी
ज्योतिरादित्य सिंधिया विमातळ बैठक बातमी

ज्योतिरादित्य सिंधिया विमातळ बैठक बातमी

sakal_logo
By

केंद्रीय मंत्री शिंदे यांनी घेतला
विमानतळाचा आढावा
कोल्हापूर, ता. २८ ः केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचा आढावा घेतला. दिल्लीतील अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी ऑनलाइन बैठक घेतली. यात त्यांनी प्रलंबित कामांची माहिती घेऊन ती तातडीने पूर्ण करण्याची सूचना केली.
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी २६ हेक्टर जमीन आवश्यक असून, त्यातील १० हेक्टर संपादित करायची आहे. भूसंपादनाचे कामही गतीने सुरू आहे. विस्तारित कामांमध्ये पार्किंग, धावपट्टी, टर्मिनल, कार्गो या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. आज त्यांनी विस्तारीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. यासाठी त्यांनी दिल्लीतील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामे कोणती आहेत, त्यातील किती काम पूर्ण झाले आहे, किती अद्याप बाकी आहे, त्यासाठी किती कालावधी लागणार आहे या सर्व बाबींची त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. जी कामे रखडली आहेत, त्यातील समस्या तातडीने दूर करून विस्तारीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. या वेळी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे उपस्थित होते.