
कोल्हापूर
86033
सुसंस्कार हायस्कूलमध्ये विज्ञान दिन
कोल्हापूर : कदमवाडी-भोसलेवाडी येथील सुसंस्कार हायस्कूलमध्ये भित्तिचित्र प्रदर्शन, विज्ञान रांगोळी, प्रयोगाचे सादरीकरण, वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयांवर व्याख्यान अशा विविध उपक्रमांनी राष्ट्रीय विज्ञान दिन आणि मराठी राजभाषा दिन एकत्रित साजरा करण्यात आला. सुसंस्कार शिक्षण मंडळाच्या सचिव रुबिना अन्सारी अध्यक्षस्थानी होत्या. माजी मुख्याध्यापक अनिल चव्हाण प्रमुख पाहुणे होते. प्रमुख उपस्थित संचालक शबाना खान, मुख्याध्यापक विजय भोगम उपस्थित होते. शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. गौरी बावधने, प्रतीक्षा गावडे, संगीता शाह, सुजल पाटील, गायत्री तुपूरवाडकर, अनुष्का वायंगणकर, वैष्णवी गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. उपक्रमासाठी जकिया मगदूम, गजानन गुरव, शोभा कांबळे यांनी परिश्रम घेतले. सुजल पाटील, समृद्धी घडशी यांनी सूत्रसंचालन केले. संजय कळके यांनी आभार मानले.
उपकरण स्पर्धेतील विजेते विद्यार्थी असे ः समृद्धी घडशी (न्यूटन्स क्रॅडल), सुजल पाटील (हायड्रॉलिक क्रेन), देवेन पवार (स्मोकर उपकरण), राजनंदिनी कुलदीप (किडनी मॉडेल), मयूरी पाटील (सॅटेलाईट ट्रान्समिशन). विज्ञान रांगोळी स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेते असे ः योगिता फाळके, रसिका शेळके, गायत्री तुपूरवाडकर.