
एकनाथ आंबोकर यांना पीएच.डी.
86126
एकनाथ आंबोकर यांना पीएच.डी.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना शिवाजी विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली. ‘निम्न प्राथमिक स्तरावरील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील पुनर्रचित अभ्यासक्रम अंमलबजावणीच्या सद्य:स्थितीचा तौलनिक अभ्यास’ या विषयावरती संशोधन करून ज्ञानरचनावादी अध्ययन-अध्यापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची वर्तमानकालीन स्थिती, याविषयी वस्तूस्थितीदर्शक निष्कर्ष मांडले आहेत. तसेच शासनाला व शिक्षकांना संशोधनाच्या निष्कर्षांच्या आधारे शिफारशी केलेल्या आहेत. माजी प्राचार्य डॉ. रामचंद्र बेलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. आंबोकर यांनी संशोधन कार्य पूर्ण केले आहे. तसेच प्रा. डॉ. नीलमा सप्रे, एम. फिलच्या मार्गदर्शिका प्रा. डॉ. पुष्पा वासकर, प्राचार्य डॉ. आय. सी. शेख, प्रा. डॉ. सर्जेराव चव्हाण, रत्नागिरी तालुक्यातील तत्कालीन केंद्रप्रमुख यांनीही त्यांना मार्गदर्शन केले.