
ग्लोबल क्लास रूमचे हात्तिवडेमध्ये उद्घाटन
ग्लोबल क्लासरूमचे
हात्तिवडेत उद्घाटन
आजरा, ता. १ : हात्तिवडे (ता. आजरा) येथील श्री सरस्वती हायस्कूलमध्ये संवेदना ग्लोबल क्लासरूम उभारण्यात आले आहे. यासाठी संवेदना फाउंडेशन (आजरा) व अॅमेझॉन कंपनी यांचे सहकार्य लाभले. याची संकल्पना संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष व ॲमेझॉन इंडियाचे मुख्य अधिकारी अण्णाप्पा पाटील यांची आहे. आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.
संवेदनाचे अध्यक्ष पाटील व संवेदना सदस्य वैभव खवरे यांनी ऑनलाइन पद्धतीने ग्लोबल क्लासरूम ही संकल्पना स्पष्ट केली. महात्मा शिक्षणप्रसारक मंडळाचे (हात्तिवडे) संचालक गोविंद शेंडे अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक उदय आमणगी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गटविकास अधिकारी दाईंगडे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ध्येय निश्चित करावे व अभ्यासासाठी परिश्रम घ्यावेत.’’ चिगरे यांनी वैज्ञानिक डॉ. सी. व्ही. रमण यांच्याविषयी माहिती दिली. महात्मा शिक्षणप्रसारक मंडळाचे (हात्तिवडे) अध्यक्ष विश्वास चव्हाण, सर्व संचालक, संवेदना फाउंडेशनचे सचिव केसरकर, अमर पाटील, हात्तिवडेच्या सरपंच शकुंतला सुतार, उपसरपंच प्रमिला पाटील, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. राजगोळकर यांनी सूत्रसंचालन केले. चव्हाण यांनी आभार मानले.