Fri, March 24, 2023

स्वच्छतामोहिम
स्वच्छतामोहिम
Published on : 1 March 2023, 2:52 am
86178
धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शहरात स्वच्छता मोहीम
कोल्हापूर ः रेवदंडा, अलिबाग येथील महाराष्ट्रभूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे बुधवारी (ता. १) शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम झाली. एक हजार ८८५ स्वयंसेवकांनी ५० टन ओला व २६ टन सुका कचरा संकलित केला. सकाळी आठपासून सुरू झालेल्या मोहिमेची अकराला सांगता झाली. महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हे अभियान राबविण्यात आले. प्रतिष्ठानतर्फे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून वृक्षारोपण व संवर्धन, स्वच्छता अभियाने, दुर्घटनाग्रस्तांना मदत, स्मशानभूमी नूतनीकरण, धरणातील गाळ काढणे, वनराई बंधारे बांधणे अशी समाजपयोगी कामे केली जातात.