नगररचना कॅम्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगररचना कॅम्प
नगररचना कॅम्प

नगररचना कॅम्प

sakal_logo
By

नगररचनाच्या विशेष कॅम्पमध्ये
दोन दिवसात ६१ प्रकरणे मंजूर
कोल्हापूर, ता. २ : महापालिकेने विकास परवानगीबाबत आयोजित केलेल्या विशेष कॅम्पमध्ये दोन दिवसांत ६१ प्रकरणे मंजूर करण्यात आली. नगररचना विभागामार्फत आयोजन केले होते. भोगवटा प्रमाणपत्र १०, बांधकाम परवानगी २०, एकत्रीकरण व विभाजन ७, मुदतवाढ ६, प्रारंभ प्रमाणपत्र १३, डिपॉझीट परत ५ अशा ६१ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. कॅम्पला प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहाय्यक संचालक नगररचना अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प घेण्यात आला. उपशहर रचनाकार रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंत्यांनी कामे तपासून सादर केली. क्रिडाई सदस्य, मिळकतधारक, आर्किटेक्ट, इंजिनिअर सहभागी झाले होते.