कपीलतीर्थ मार्केट बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कपीलतीर्थ मार्केट बैठक
कपीलतीर्थ मार्केट बैठक

कपीलतीर्थ मार्केट बैठक

sakal_logo
By

86492

कपिलतीर्थ मार्केटच्या
जागेला विरोधच राहणार

व्यापाऱ्यांची बैठक, तीव्र आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः श्री अंबाबाईच्या भाविकांना विविध सुविधा पुरवण्याचे कारण पुढे करून पुन्हा कपिलतीर्थ मार्केटच्या जागेचा विषय पुढे आला आहे; मात्र त्यासाठी मार्केटमधील व्यापाऱ्यांचा विरोधच राहणार आहे. पुन्हा या विषयावर चर्चा सुरू झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा कपिलतीर्थ व्यापारी असोसिएशनने दिला आहे. मार्केटमधील व्यापाऱ्यांची आज सायंकाळी बैठक झाली. त्यात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महापालिकेला सर्वाधिक कर देणारे शहरातील हे मार्केट आहे; मात्र महापालिकेने येथे कुठल्याही सुविधा केलेल्या नाहीत. स्वच्छतागृहे बांधली आहेत. तेथे मुबलक पाणीही नाही, अशी स्थिती आहे. विजेची सुविधाही व्यापाऱ्यांनी वर्गणी काढून केली आहे. भाविकांच्या सुविधांसाठीचा विषय आला की, प्रत्येक वेळी मार्केटची जागा दिसते. मागील वेळी येथे पार्किंगचा विषय आला. त्यावेळीही विरोध झाल्याने अन्य पर्यायांचा विचार झाला. आता पुन्हा मार्केटच्या जागेची चर्चा सुरू झाली आहे. सध्या आहे त्यापेक्षा अधिक मजल्यांचे बांधकाम येथे नियमाप्रमाणे करता येत नाही. त्यामुळे येथे आणखी कुठल्याही प्रकारचे बांधकाम होऊ दिले जाणार नाही, असे संदीप वीर, प्रदीप इंगवले यांनी सांगितले.
ताराबाई रोडवरील काही केबिन्स मार्केटच्या पार्किंगमध्ये तात्पुरत्या स्थलांतरित करण्यात आल्या; पण त्यामुळे मार्केटसाठीचे पार्किंग बंद झाल्याने ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. मार्चपर्यंत या केबिन्स येथे राहतील, असे महापालिकेने सांगितले होते. त्यामुळे आता त्यासाठीही पाठपुरावा सुरू केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी राहुल सोनाळे, महंमद शेख, चंद्रकांत आयरेकर आदी उपस्थित होते.