
राज्य उत्पादन छापा
86482
बनावट विदेशी मद्याची तस्करी
करताना किणीत एकास अटक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ः किणी (ता. हातकणंगले) येथे पुठ्यांच्या बॉक्समध्ये बनावट विदेशी मद्याची तस्करी करताना एकास अटक केली. दिनेश जेकनराम कुमार (वय ३० रा. कावोकी बेरी, रोहिला, ता. धोरीमन्ना गुडा मलानी, जि. बाडमेर राज्य राजस्थान) याला अटक केली. त्याच्याकडून ३५ लाख ५३ हजार दोनशे रुपयांचे मद्य आणि कंटेनर असा सुमारे ४६ लाख ५३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, कागदी पुठ्ठ्यांच्या बॉक्समधून विदेशी मद्याची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पुणे-बंगळूर महामार्गालय किणी तेथे छापा टाकला. अवैध मद्याची वाहतूक करीत असताना सहाचाकी कंटेनरमध्ये कागदी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये बनावट विदेशी मद्य असल्याचे दिसून आले. यामध्ये आईस मॅजिक ग्रीन अॅपल ७५० मिलीच्या एकूण ३ हजार २४० सिलबंद काचेच्या बाटल्या व १८० मिलीच्या एकूण ६ हजार २४० सिलबंद काचेच्या बाटल्या असे एकूण ४०० बॉक्स वाहतूक करीत असताना मिळून आले. एकूण ४६ लाख ५३ हजार २०० रुपयांचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे करीत आहेत.