
लाच प्रकरणी आरळे पन्हाळ्यातील एकास अटक
86534
१३ हजाराची लाच
घेताना एकास अटक
‘लाचलुचपत प्रतिबंधक’ची आरळेत कारवाई
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः आरळे (ता. पन्हाळा) येथील श्री खंडोबा सहकारी मच्छीमारी संस्थेच्या अध्यक्षाला १३ हजार रुपयांची लाच घेताना आज सातवे (ता. पन्हाळा) येथे अटक करण्यात आली. सीताराम पाटलू पोवार (वय ४८, रा. गोसावी गल्ली, आरळे) असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महापुरात तक्रारदारांच्या भावाच्या मच्छीमारी जाळ्यांचे नुकसान झाले होते. नुकसानभरपाई मिळावी यासाठी त्यांनी श्री. खंडोबा सहकारी मच्छीमारी संस्थेच्या वतीने शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाला मंजुरी मिळवून अनुदान मिळवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष पोवार याने तक्रारदाराच्या भावाकडे १३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी २४ फेब्रुवारीला कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज सातवे (ता. पन्हाळा) येथे लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने पोवार याला आज दुपारी अटक केली. तक्रारीची पडताळणी करूनी कारवाई करण्यात आली. लाचखोर पोवार याच्यावर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिली.