
क्रिएटीव्हमध्ये आरोग्य तपासणी शिबीर
क्रिएटिव्हमध्ये आरोग्य तपासणी शिबिर
गडहिंग्लज : येथील क्रिएटिव्ह हायस्कूलमध्ये शिक्षकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर झाले. सक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असल्याने संस्थेतर्फे शिबिराचे आयोजन केले होते. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई, सचिव आण्णासाहेब बेळगुद्री यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर झाले. मुख्याध्यापक दिनकर रायकर यांनी नियोजन केले होते.
---------------------------
gad32.jpg :
86554
सुशांत गुरव
सुशांत गुरव समाजशास्त्रात दुसरा
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाचा विद्यार्थी सुशांत गुरव याने शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक पटकावला. एमए समाजशास्त्रमध्ये ७७.८१ टक्के गुण मिळवले. यशाबद्दल महाविद्यालयातर्फे त्याचे अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांचे प्रोत्साहन मिळाले. संस्थेचे सचिव व समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, डॉ. एस. डी. सावंत, डॉ. आर. पी. हेंडगे यांचे मार्गदर्शन लाभले.