
आरटीई प्रवेश प्रक्रिया प्रारंभ
86669
...
आरटीईच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः शिक्षणाचा अधिकार याअंतर्गत बालकांचे खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळविण्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. याची सुरुवात अहिल्याबाई सेंट्रल स्कूलमध्ये करण्यात आली. महापालिकेचे प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
आरटीईअंतर्गत बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार २००९ अधिनियमानुसार दुर्बल, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळवण्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवार (ता. २) ते शुक्रवार (ता. १७) या कालावधीत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहेत. १ जुलै २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत जन्मलेली मुले या प्रक्रियेसाठी पात्र असतील.
उद्घाटनप्रसंगी जगदीश ठोंबरे, नचिकेत सरनाईक, सर्व शिक्षा अभियानाचे अविनाश लाड, आस्मा पठाण, श्रावण कोकितकर, मुख्याध्यापिका सारिका पाटील, मनीषा तळप, सुवर्णा पालकर, बार्टीच्या समतादूत आशा रावण उपस्थित होत्या. आरटीईअंतर्गत मोफत प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहन बार्टीच्या रावण यांनी केले आहे.
-------
आवश्यक कागदपत्रे
- बालकाचा जन्म दाखला
- रहिवाशी पुरावा (रेशन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, राष्ट्रीय बँकेचे पासबुक)
- आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा १ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला
- सामाजिक वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला आवश्यक
- बालकाचे छायाचित्र