पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

तरुणास तिघांजणांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

कोल्हापूर, ता. ३ : दुचाकीच्या थकीत हप्त्यांबाबत विचारणाऱ्या तरुणास तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अक्षय रमेश पोवार (वय २९, रा. सोमवार पेठ, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. त्याच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारल्याने तो जखमी झाला. संग्राम पाटील, किरण व सुहास ऊर्फ सोन्या पोवार (पूर्ण नाव माहीत नाही) अशी संशयितांची नावे आहेत. पार्वती चित्रपटगृहाच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी (ता. २) रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय त्याच्या मित्रांसमवेत पार्वती चित्रपटगृहाजवळ थांबला होता. त्यावेळी संग्राम, किरण व सुहास दुचाकीवरून जात होते. अक्षयने त्यांना गाडी कोणाची आहे व गाडीचे सोळा हप्ते थकीत असल्याचे सांगितले. त्यावर तिघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुहासने त्याच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारल्याने तो जखमी झाला.