मनपा फुटबॉल स्पर्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा फुटबॉल स्पर्द
मनपा फुटबॉल स्पर्द

मनपा फुटबॉल स्पर्द

sakal_logo
By

महापालिका चषक फुटबॉल स्पर्धा सोमवारपासून
कोल्हापूर, ता.३ ः महापालिकेच्यावतीने सोमवारपासून (ता.६) महानगरपालिका चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. १९ मार्चला अंतिम सामना असून, छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा होणार आहे. त्यात शहरातील १४ संघ सहभागी होणार आहेत. बक्षिसांची एकूण रक्कम चार लाख पाच हजार इतकी आहे, अशी माहिती महापालिकेचे इस्टेट अधिकारी सचिन जाधव, सचिन पांडव यांनी दिली.
कोल्हापूर स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान तसेच शासकीय योजनांचा प्रसार करत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. बाद पद्धतीने होणारी स्पर्धा कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन व कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशन यांच्या नियमानुसारच होईल. १८ तारखेला प्रदर्शनीय सामना होणार आहे. सुरक्षेसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडील कर्मचारी, प्रथमोपचार व्यवस्थेसाठी आरोग्य विभागाची ॲब्युलन्स, फिजोओथेरपीस्ट उपलब्ध असतील. सीसीटीव्ही सुविधा आहे. विजयी संघास एक लाख ५० हजार व चषक, उपविजेत्या संघास ७५ हजार व चषक असे बक्षीसाचे स्वरुप आहे. याशिवाय उत्कृष्ट गोलकिपर, उत्कृष्ट डिफेन्स, उत्कृष्ट हाफ, उत्कृष्ट फॉरवर्ड खेळाडूस प्रत्येकी १० हजार व चषक तर स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूस २० हजार व चषक असे बक्षीस आहे. पहिल्या फेरीत बाद होणाऱ्या आठ संघास प्रत्येकी पाच व दुसऱ्या फेरीत बाद होणाऱ्या संघास प्रत्येकी दहा हजार देण्यात येणार आहेत. उपांत्य सामन्यातील पराभूत दोन्ही संघास २० हजार बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूला ट्रॅकसूट देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त फूटबॉल प्रेमी यांनी स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करणेत येत आहे.