आजऱ्यात विकासकामांचे आज उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यात विकासकामांचे आज उद्‌घाटन
आजऱ्यात विकासकामांचे आज उद्‌घाटन

आजऱ्यात विकासकामांचे आज उद्‌घाटन

sakal_logo
By

आजऱ्यात विकासकामांचे आज उद्‌घाटन
आजरा, ता. ३ ः आजरा तालुक्यात विविध विकासकामांचे उद्या (ता. ४) उद्‌घाटन होत आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने काही कामे झाली असून सुमारे दहा कोटींच्या विकासकामांचे भुमीपूजन केले जाणार आहे. आमदार प्रकाश आबिटकर व मान्यवरांच्याहस्ते उद्‌घाटन व भुमीपूजन होणार आहे.
आजरा शहरात माहेर मल्टीस्पेशालिटी हॅस्पिटल आजरा येथे महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा प्रारंभ सकाळी होणार आहे. आवंडी (ता. आजरा) धनगरवाड्यावर मुख्यमंत्री सडक योजना लोकार्पण, सामाजिक सभागृह, अंगणवाडी लोकार्पण वाडा क्रमांक एक, अंगणवाडी वाडा क्रमांक तीन भूमीपूजन, जलजीवन योजना वाडा क्रमांक तीन या विकासकामांचे लोकार्पण व भूमीपुजन होईल. एरंडोळ (ता. आजरा) येथे गांधीनगर , पोळगाव, एऱंडोळ बजवडेकडे जाणारा रस्ता, अंतर्गत रस्ता (ग्रामपंचायतीपासून शाळेपर्यंत) पाटील गल्ली व माधव गल्ली रस्ता, ग्रामपंचायतवरील मजला, मागासवर्गीय वस्तीमधील पेव्हींग ब्लाॅक बसवणे आदी कामांचे भूमीपुजन केले जाणार आहे. पेरणोली (ता. आजरा) येथे एकता गृहतारण संस्थेचे उद्घाटन, रवळनाथ मंदिर सुशोभिकरण, तलाठी कार्यालय, जलजीवन योजना, पाझर तलाव, मुख्यमंत्री सडक नावलकरवाडी, धनगरवाडी रस्ता, धनगरवाडा वीज शुभारंभ. मसोली (ता. आजरा) जलजीवन योजना, अंतर्गत रस्ते गांधीनगर, मागासवर्गीय समाजमंदिर सुशोभिकरण शुभारंभ होईल.